Congratulations Vaishali Made : First Woman winner of Saregamapa Challenge!!

This blog is to support Vaishali Made (Bhaisane Made / Mhade), an amazing singer in Sa re ga ma pa Challenge 2009.

Vaishali Made has so far won:

SaReGaMaPa Marathi (JAn'08).
SaReGaMaPa Challenge 2009 (Jan 09)
SaReGaMaPa Mega Challenge for Maharashtra team(Dec 2009).

Vaishali is soon releasing her own album of Marathi songs and her upcoming Hindi/Marathi playback songs are releasing next year.
Vaishali fans are proud of her well deserved success !
Keep rocking, Vaishali !

Thursday, September 24, 2009

Vaishali Mhade joins Raj Thackrey's Party

सेनेच्या ’ आयडॉल’ समोर मनसेची ’महागायिका’ Print E-mail
मुंबई, १३ सप्टेंबर/ प्रतिनिधी


इंडियन आयडॉल अभिजीत सावंत याने शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेने थेट महागायिका वैशाली भैसणे-माडे हिला मैदानात उतरविण्याचे निश्चित केल्याचे विश्वसनीयरित्या समजते. युवकांची मते खेचण्यासाठी सेलिब्रेटीजना पक्षात आणण्याचा धडाका सध्या या दोन्ही पक्षांनी लावला आहे. वैशाली भैसणे-माडे हिने रविवारी राज ठाकरे यांची भेट घेतली, या भेटीमध्ये तिच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये वैशाली माडे ’मनसे’ मध्ये अधिकृतपणे प्रवेश करण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.
झी मराठीवरील पाठोपाठ हिंदी मधील ’सारेगमप’ची महागायिका म्हणून वैशाली माडे लोकप्रिय आहे. या कार्यक्रमावेळी वैशालीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता तसेच तिला विजयी करण्यासाठीही आवाहन केले होते. महागायिकेचा मुकुट डोक्यावर चढल्यानंतर एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राजकारणामध्ये प्रवेश करण्याचे संकेत तिने दिले होते. त्यामुळे मनसेमध्ये प्रवेश केल्यानंतर तिला अमरावती विभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इंडियन ऑयडॉल अभिजीत सावंत तसेच ’भाऊजी’ फेम आदेश बांदेकर यांना शिवसेनेने आपल्या गोटात आणल्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेने महागायिकेला पक्षात स्थान देण्याचे निश्चित केल्याचे सांगण्यात आले.